'ग्राहका, कधी रे येशील?' पुण्यात दुकाने उघडली, पण खरेदीसाठी कुणी फिरकलंच नाही!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

लक्ष्मी रस्त्यावरील काही सराफ दुकानांबाहेर सकाळी मोठ्या रांगा लागल्या होत्या.

पुणे : मे महिना म्हटलं की लग्नसराई... त्यामुळे या दिवसात लक्ष्मी रस्त्यावरील साड्या-कपड्याच्या दुकानदारांची किमाई सहा ते आठ लाख रूपयांचा धंदा होतो. मात्र गुरुवारचा दिवस ग्राहकांची वाट पाहण्यातच गेला... ही एका दुकानदारांची प्रतिक्रिया. एकीकडे कपडा व्यावसायिकांची ही स्थिती, तर दुसरीकडे मोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक, इलेक्‍ट्रिकलसह सोन्या-चांदीच्या दुकानदारांची देखील हीच परिस्थिती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 मार्चपासून शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील सर्व बाजारपेठातील व्यवहार ठप्प पडले आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये रेड झोन वगळता अन्य भागातील दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

खुशखबर! आता पगारात होणार वाढ अन् पीएफमध्ये...

मंगळवारपासून शहरात हळूहळू दुकाने उघडण्यास व्यापाऱ्यांनी सुरूवात केली आहे. परंतु सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेचे बंधन त्यांच्यावर घालण्यात आले आहे. रस्त्यावरील अनेक ठिकाणी टाकण्यात आलेले बॅरिगेट्‌स काढण्यात आलेले नाहीत. डिलेव्हरीसाठी जाता येत नाही, टेम्पो मिळत नाही, दुकान सुरू आहे, परंतु कामगार रेडझोन मध्ये राहणारे असल्यामुळे अडकले आहेत, असे अनेक अडचणीमुळे आज दुसऱ्या दिवशीही व्यापाऱ्यांना या गोष्टींच्या अडचणींना तोंड द्यावे लागले. एखाद दुसरे ग्राहक सोडले, तर दिवसभर वाट पाहण्यापलिकडे दुसरे काहीच काम नाही.

- Breaking : अम्फान चक्रीवादळानं बंगालमध्ये घातलं थैमान; आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू!

साड्यांचे व्यापारी विक्रम आगरवाल म्हणाले, ''लग्नसराईमध्ये दररोज सहा ते आठ लाख रूपयांचा व्यवसाय होत होता. आज मात्र दहा हजार रूपयांचाही व्यवसाय होत नाही. दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी लोकांना रस्त्यावर येण्यास फारशी परवानगी नाही. त्यामुळे दिवस ग्राहकांची वाट पाहण्यातच जातो,'' अशा शब्दात आपली व्यथा अनेक दुकानदारांनी बोलून दाखविली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मात्र लक्ष्मी रस्त्यावरील काही सराफ दुकानांबाहेर सकाळी मोठ्या रांगा लागल्या होत्या. चौकशी केल्यानंतर कोणी भिशीचे पैसे भरण्यासाठी, तर कोणी भिशी संपल्यामुळे त्या मोबदल्यात सोने खरेदीसाठी आलेल्यांची ती गर्दी असल्याचे समजले. इलेक्‍ट्रिक आणि इलेक्‍ट्रॉनिंकच्या दुकानात मात्र काही प्रमाणात गर्दी दिसत होती. परंतु नवीन वस्तू खरेदी करण्याऐवजी जुन्या वस्तूंची दुरूस्तीसाठीचे ग्राहक जास्त असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले. ग्रोसरीचे दुकाने वगळता अभावानेच अन्य वस्तूंच्या दुकांनांमध्ये आज अभावाने ग्राहक असल्याचे दिसून आले. 

- आता घरबसल्या मिळणार पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तके; 'बालभारती'कडे करा 'ऑनलाईन ऑर्डर'!

इलेक्‍ट्रॉनिक दुकानदार विनोद आगरवाल म्हणाले, ''दुकाने उघडली, पण डिलिव्हरी कशी करावयाची. जागोजागी बॅरिगेट्‌स आहे. टेम्पो मिळत नाही अशा अनेक अडचणी आहेत. या उलट ऑनलाइन कंपन्यांना सर्वच मुभा दिली आहे. त्यामुळे दोन महिन्यानंतरही आम्ही अडचणीतच आहोत.'' 

सोने व्यापारी फत्तेचंद रांका म्हणाले, ''दुकाने सुरू झाली असली, तरी रस्ते अजूनही बंद आहेत. नागरिकांमध्ये कोरोनाबद्दलची भिती अद्यापही कायम आहे. लग्नसराई देखील नसल्यामुळे फारसे गिऱ्हाईक नाही. ग्राहक सुरू होण्यास आणखी काही दिवस वाट पाहवी लागणार आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Whole day has been spent waiting for customers, reactions given by shopkeepers in Pune