पुण्यात सापडले २ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण; गेल्या २४ तासांतील आकडेवारी सांगते...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

पुणे जिल्ह्यात बुधवारला दिवसभरात २ हजार ३३१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार १०१ जणांचा समावेश आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.५) दिवसभरात २ हजार ३३१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार १०१ जणांचा समावेश आहे. दरम्यान, बुधवारी ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे पुणे जिल्ह्यातील आज अखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ९७ हजार ३०९ झाली आहे. याशिवाय आतापर्यंत दोन हजार २३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार १०१, पिंपरी-चिंचवडमधील ७९५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २८४, नगरपालिका क्षेत्रातील १०४ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डातील ४७ रुग्णांचा समावेश आहे.

खडकवासला धरणातून पाणी सोडले जाणार; नदीकाठच्या पुणेकरांना दक्षतेचा इशारा​

दरम्यान, बुधवारी दिवसभरात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही मंगळवारी (ता.४) रात्री ९ वाजल्यापासून बुधवारी (ता. ५) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. आज मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील १७, पिंपरी-चिंचवडमधील १८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ९ आणि नगरपालिका क्षेत्रातील २ रुग्णांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune 2331 new corona patients have found in one day 2021