पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; मृतांचा आकडा तीन हजाराजवळ पोहोचला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

शुक्रवारी ६६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २७ रुग्ण आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१४) दिवसभरात २ हजार ४४९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील सर्वांधिक १ हजार १७७ जणांचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात ६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये ९१९, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २२२, नगरपालिका क्षेत्रात ९७ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ३४ नवे रुग्ण सापडले आहेत.

पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या अडचणी काही कमी होईनात; रक्तसाठा पडतोय कमी!​

शुक्रवारी ६६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २७ रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील ११, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १५, नगरपालिका क्षेत्रातील ८ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील ५ जणांचा समावेश आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. १३) रात्री ९ वाजल्यापासून आज (ता. १४) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

पुणे जिल्ह्यातील आजअखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख ९९ हजार ९६५ तर रुग्णांच्या मृत्यूची संख्या २ हजार ८९५ झालीं आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ७५ रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाबाधित रुग्णांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले निर्देश, म्हणाले...​

एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ७१ हजार ५०३, पिंपरी चिंचवडमधील ३३ हजार ४८४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ९ हजार ४७३, नगरपालिका क्षेत्रातील २ हजार ८८१ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या क्षेत्रातील २ हजार ६२४ रुग्ण आहेत.

कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 

- पुणे शहर ---- ५५ हजार १००.

- पिंपरी चिंचवड ---- २५ हजार ६१.

- जिल्हा परिषद --- ७ हजार १३८.

- नगरपालिका ---- २ हजार ९५.

- कॅंंटोन्मेंट बोर्ड ---- १ हजार ९९५.

- एकूण ----- ९१ हजार ३८९.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune 2449 new corona patients found on Friday 14th August 2020