Corona Virus : पुण्यात आणखी ४ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा पोहोचला...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी, पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर गेली असून त्यातील एक बारामती तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत. पुणे शहरात १६८, पिंपरी चिचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे. असल्याची माहिती दिली.

पुणे :  पुण्याही आता कोरोनाने हाहाकार माजविला असून, कोरोनाची लागण झालेल्या आठ जणांचा काल (बुधवारी) दिवसभरात मृत्यू झाला. दरम्यान, आज कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर पोहलचली असून  पुण्यात आणखी ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
याबाबत, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी, पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर गेली असून त्यातील एक बारामती तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत. पुणे शहरात १६८, पिंपरी चिचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे. असल्याची माहिती दिली. काल एकाच दिवसात ८ जणांचा जीव गेल्याने पुण्यात घबराट पसरली आहे. त्यात आणखी ४ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाचे संकट वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

Coronavirus : लॉकडाऊनमध्येही तुम्हाला करता येणार परराज्यात प्रवास

शहरात कोरोनाचा पहिला बळी 30 मार्चला गेला. त्यानंतर आठवडाभरातच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून, मंगळवारी दिवसांत तिघांचा मृत्य झाला होता. त्यानंतर ससून, नायडू आणि काही खासगी रुग्णालयांतील रुग्णांचाही मृत्य झाला.

oronavirus : पुणे जिल्ह्यातील 'ही'; २० तपासणी केंद्रे सुरू राहणार २४x७!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In pune 4 mores death and total count is 20 due to corona virus