पुण्यात पारा 40.8 अंशांवर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

पुणे - राज्यात वैशाख वणव्याचा चटका कायम असून, गुरुवारी चंद्रपूर येथे सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यातही या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमान नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानाच्या पाऱ्याने 40.8 तर लोहगाव येथे 42 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली आहे. पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट निर्माण होईल, असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात येणार आहे. 

मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाली. कोकण आणि मराठवाड्यातील तापमान अंशतः वाढले होते. कोल्हापूरमध्ये संध्याकाळी पावसाच्या सरी पडल्या. त्यामुळे तेथील रात्रीचे तापमान अंशतः कमी होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. 

पुण्यात सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत होता. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील कमाल तापमानाचा पारा चाळिशीपेक्षा जास्त नोंदला जात आहे. शहरात बुधवारी (ता. 9) 40.7 अंश सेल्सिअस नोंदले होते. आज 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

Web Title: Pune 40.8 degrees