परदेशात नोकरीचं आमिष; पुण्यात 72 जणांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

परदेशात नोकरी मिळवून देण्याचा बहाणा करुन एका तरुणाची एक लाख 66 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका खासगी कंपनीच्या संचालकाविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे - परदेशात नोकरी मिळवून देण्याचा बहाणा करुन एका तरुणाची एक लाख 66 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका खासगी कंपनीच्या संचालकाविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रकरणी रक्षित गौतमभाई पटेल (रा. बडोदा) व रूबीकुमारी सुशीलकुमार पोद्दार (रा. विमाननगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमित विजय सरोदे (वय ,रा. मंगळवार पेठ) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सरोदे यांनी परदेशात नोकरी मिळवण्यासाठी एका संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. त्यानंतर संशयित आरोपी पटेल व पोद्दार यांनी सरोदे यांनी सरोदे यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. कॅनडात नोकरीची संधी आहे. विमान खर्च, नोंदणी शुल्क, वैद्याकीय तपासणी तसेच व्हिसा शुल्कापोटी एकुण मिळून एक लाख 66 हजार रुपये भरावे लागतील, असे आरोपींनी सरोदे यांना सांगितले. 

पुण्यात कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भीषण आग; मशिनरी जळून खाक

सरोदे यांना कंपनीत नियुक्ती झाल्याचे बनावट पत्र तसेच कॅनडा सरकारचे बनावट पत्र दिले. दरम्यान, नोकरीबाबत विचारणा केल्यानंतर पटेल आणि पोद्दार यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरोदे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सरोदे, त्यांचा मित्र यांच्यासह 72 जणांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune 72 cheated with foreign job offer