पुणे : मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी भावी डॉक्टर बनले चोर

ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे आरोपी कैद झाले होते.
पुणे : मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी भावी डॉक्टर बनले चोर

हडपसर : सध्या पुण्यात तरुणांकडून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली असून, मैत्रिणींना भेट देण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करणाऱ्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना हडपसर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. अनिकेत हनुमंत रोकडे(वय -२२), वैभव संजय जगताप ( वय २२ रा.) अशी या तरूणांची नावे आहेत.

हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत रोकडे हा बी.ए.एम.एस व वैभव संजय जगताप बी. एस. सी नर्सिंगचे तृतीय वर्षात शिक्षण घेत होते. काही दिवसांपूर्वी हडपसर येथील नामांकित दुकानात दोन अनोळखी तरुण मास्क लावून आतमध्ये शिरले होते. तेव्हा त्यांनी अंगठ्या दाखवण्यास सांगीतले आणि त्यातील तीन अंगठ्या निवडल्या. दरम्यान दोघांपैकी एक तरूण दुकानातून बाहेर गेला. त्यानंतर दुकानातील कामगार पाठीमागे वळून सोन्याचा ट्रे ठेवत असताना दुसरा तरुण तीन अंगठ्या चोरून दुकानाचे बाहेर पळून गेला , बाहेर आधीच मोटारसायकलवर बसलेल्या साथीदारासह तेथून भरधाव वेगाने धूम ठोकली.

-बजरंग देसाई,

सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर

पुणे : मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी भावी डॉक्टर बनले चोर
औरंगाबाद : चाळीस शाळांमध्ये गणित शिक्षकांची कमतरता

ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे आरोपी कैद झाले होते. मात्र तोंडाला मास्क लावल्यामुळे आरोपीची ओळख पटत नव्हती. व्यसनासाठी व मैत्रिणी सोबत चैनीकरीता व गिफ्ट देण्यसाठी वरिल चोऱ्या केल्या असल्याची कबुली त्यांनी दिली आहे, अशी माहिती हडपसर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली..

अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

हडपसर पोलीस स्टेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com