पहिली पासूनच्या मित्रांचा शेवटही एकत्रच

रमेश वत्रे
शनिवार, 20 जुलै 2019

सर्व आठ जण विद्या विकास मंदिर (यवत) येथे २०१४ - १५ च्या १० वी बॅचमध्ये एकत्र शाळेत होते. यातील सर्व जण इयत्ता पहिली पासून एकमेकांचे वर्गमित्र होते. सकाळी विद्यार्थी शाळेत आले. तेव्हा मृतांना श्रद्धांजली वाहून शाळा बंद ठेवण्यात आली.

केडगाव : पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात यवतमधील 9 युवक ठार झाले. या नऊपैकी आठ जण एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकणारे होते.

सर्व आठ जण विद्या विकास मंदिर (यवत) येथे २०१४ - १५ च्या १० वी बॅचमध्ये एकत्र शाळेत होते. यातील सर्व जण इयत्ता पहिली पासून एकमेकांचे वर्गमित्र होते. सकाळी विद्यार्थी शाळेत आले. तेव्हा मृतांना श्रद्धांजली वाहून शाळा बंद ठेवण्यात आली. या घटनेमुळे यवतमधील अन्य शाळाही बंद ठेवण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी गजबजल्या जाणाऱ्या शाळांमध्ये घटनेमुळे शुकशुकाट होता. 

सर्वजण काल सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ताम्हिणी घाटात (रायगड) वर्षा विहारासाठी गेले होते. दुभाजक ओलांडून आलेल्या इरटीका कारने ट्रकला धडक दिली. कारमधील सर्व जण ठार झाले. मृतांमध्ये अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद आशपाक अत्तार, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत गिघे, दत्ता गणेश यादव, व जुबेर अजित मुलाणी. शुभम भिसे वगळता सर्वजण वर्गमित्र होते. विशाल यादव, परवेझ आतार, दत्ता यादव हे हडपसर मधील jspm अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. विद्या विकास मध्ये हुशार विद्यार्थ्यांमध्ये यांचा समावेश होता. 

सर्व मृत वीस ते एकवीस वयोगटातील आहेत. सर्व युवक काल ताम्हिणी घाटात वर्षा विहारासाठी गेले होते.  काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune accident all student are friends and all stay in Yavat