कर्म एकाचे भोग तिसऱ्याला; एका दारुड्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात

नशेखोर महाशय दारू पिऊन बिनधास्त दुचाकीचालवत उड्डाणपुलावरुन विरुध्द दिशेने येते होते.
Accident
AccidentSakal

पाटस : पुणे सोलापुर महामार्गावर पाटस (ता.दौंड) येथे एका मद्यपी दुचाकीस्वरामुळे तब्बल चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. नशेखोर महाशय दारू पिऊन बिनधास्त दुचाकीचालवत उड्डाणपुलावरुन विरुध्द दिशेने येते होते. दुचाकी एका वाहनाच्या समोर आल्याने वाहनचालकाने अचानक ब्रेक दाबला. परीणामी, एका पाठोपाठ एक अशी चार वाहने एकमेकांना धडकली.सुदैवाने या अपघातात कोणीही जिवित हानी झाली नाही. रविवारी (ता.२३) रात्री नऊ वाजता ही घटना घडली. (Pune District Accident News)

याबाबत पोलिसांनी माहीती दिली. पुणे सोलापुर महामार्गावर पाटस हद्दीत एक जण दारु पिऊन दुचाकीघेवुन उड्डाण पुलावरुन सोलापुर दिशेला चालला होता.अंधारात विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी एका टॅंकरच्या समोर आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबला.त्यावेळी पाठीमागुन येणाऱया दुसऱ्या टॅंकरने समोरील टॅंकरला धडकत दिली. त्या पाठोपाठ असणारा ट्रक टॅंकरला धडकला तर एक चारचाकी मोटर ट्रकला धडकली. अशा प्रकार चार वाहनांना नाहक अपघाताचा सामना करावा लागला.

Accident
..यात माझाही दोष, अशी कबुली देत उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

यावेळी दुचाकीस्वार दुचाकी घेवुन बाजुला पडला. अपघाता दरम्यान प्रचंड आवाज झाल्याने परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दुचाकीस्वर दारुच्या नशेत होता.या विचित्र अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.माहीती मिळताच यवत पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे,सहायक पोलिस उपनिरीक्षक सागर चव्हाण,पोलिस नाइक अजित इंगवले,उमेश चव्हाण या पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पाटस टोलनाक्याच्या क्रेन सहाय्याने अपघातग्रस्त वाहनांना बाजुला काढण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी नशेखोर दुचाकीस्वराला ताब्यात घेतले आहे. हा दुचाकीस्वार वरवंड (ता.दौंड) येथील रहिवाशी असल्याचे समजते. या मद्यपी दुचाकीस्वारावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com