Pune News : कात्रज नवीन बोगद्या जवळ विचित्र अपघात; अपघातात तीन कारचा चक्काचूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune accident

Pune News : कात्रज नवीन बोगद्या जवळ विचित्र अपघात; अपघातात तीन कारचा चक्काचूर

आंबेगाव : कात्रज नवीन बोगद्याच्या बाहेर कोळेवाडी हद्दीत तीन कारचा विचित्र अपघातात पुणेच्या दिशेने येणाऱ्या तीन गाड्यांचा चक्काचुर झाल्याची घटना आज दुपारी (३ वा.) सुमारास घडली.सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली तरी झालेल्या अपघातात फुटलेल्या काचांचा खच ,अस्ताव्यस्त पडलेले गाड्यांचे पार्ट,पलटी झालेल्या गाड्या आणि गाडीतून जिवाच्या आकांताने अपघातग्रस्तांनी फोडलेला टाहो पाहून प्रत्यक्षदर्शीना धडकी भरली.

उपस्थित सजग नागरिकांनी तत्काळ जखमींना बाहेर काढले. शिवाय पोलिसांनाही वर्दी देण्यात आली. त्यानंतर ,घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस पोहचले.तसेच जखमींना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये तत्काळ दाखल करण्यात आले. नवलेपुल ते नवीन कात्रज बोगदा,जांभूळवाडी दरीपुल हा परिसर अपघाताचा हॉटस्पॉट ठरत असून,यावर ठोस उपाय करण्याची योजना आखली जावी अशी मागणी होते आहे.

अपघाताची कारणे

•नवीन बोगदा ते नवले पुल दरम्यान असणारा तीव्र स्वरूपाचा उतार.

•उतारावर न्यूट्रल केली जाणारी वाहने.

• वाहनांची अतिरिक्त वेग मर्यादा.

• हुल्लडबाज ड्रायव्हिंग,मद्यपान केलेले वाहन चालक

दुपारी तीनच्या सुमारास खेड शिवापूरहून पुण्याच्या दिशेने येत असताना आमच्या समोरच अपघात घडला.मी तत्काळ अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी गेलो.शिवाय पोलिसांनाही कळविले.काही लोकांनी आम्हाला मदत केली तर जास्तीत जास्त लोक फोटो आणि व्हिडिओ काढण्यात दंग झाले होते.अपघातावेळी मदत करणे आपले पहिले कर्तव्य असायला हव.

- एड.दिलीप जगताप, प्रत्यक्षदर्शी.

' अपघाताची वर्दी मिळताच तत्काळ आपले पोलीस घटनास्थळी दाखल झाले.तसेच जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.यात जीवितहानी झालेली नाही.

- विजय कुंभार ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,भारती विद्यापीठ पोलीस ठाणे

टॅग्स :Pune Newsaccident