
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. कुंडेश्वराच्या दर्शनाला जाताना भाविकांनी खचाखच भरलेले पिकअप वाहन कोसळले. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३१ जण जखमी झाले. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून जखमीमा उपचारासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे.