
पुण्यातील कोंढवा परिसरात एका भरधाव इनोव्हा कारने १३ वर्षांच्या मुलाला चिरडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून, कार चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आणि कारची तोडफोड केली . या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.