Pune : बारामतीत ट्रकने दुचाकीवरील पती-पत्नीला चिरडले, दोघेही ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Accident
Pune : बारामतीत ट्रकने दुचाकीवरील पती-पत्नीला चिरडले, दोघेही ठार

Pune : बारामतीत ट्रकने दुचाकीवरील पती-पत्नीला चिरडले, दोघेही ठार

sakal_logo
By
विजय मोरे

उंडवडी (जि.पुणे) : बारामती-पाटस रस्त्यावर सोनवडी-सुपे फाट्यावर भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले. या आपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवारी (ता.१८) सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान घडली. या अपघातात काळूराम गणपत लोंढे (वय ६०), शाकूबाई काळूराम लोंढे (वय 55, रा.देऊळगाव रसाळ ता. बारामती) असे (Pune) दुर्दैवी मरण पावलेल्या पती-पत्नीचे नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान माल ट्रक (एमएच १८ बीजी ०८१४ ) हा पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने निघाला होता. याच वेळी सोनवडी सुपे फाट्यावर दुचाकी (एमएच ४२ बीसी 8234 ) बारामतीच्या (Baramti) दिशेने निघाली होती. यावेळी माल ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले.

हेही वाचा: प्रवाशांना दिलासा! पुणे विमानतळ 1 डिसेंबरपासून 24 तास होणार खुला

अपघातानंतर ट्रकचा चालक व एक जण पळून गेले. या अपघातात मालाने भरलेल्या ट्रकच्या पुढील चाकाखाली दुचाकी व पती- पत्नी दोघेही अडकल्याने स्थानिक ग्रामस्थ व पोलिस मित्रांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रकमध्ये माल असल्याने आणि ट्रक चारीत अडकल्याने ट्रक जाग्यावरुन हलू शकला नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या प्रयत्नांना अपयश आले. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांनी कळविल्यानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या साह्याने ट्रक बाहेर काढला. अपघातानंतर परिसरातील लोकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती.

loading image
go to top