Pune Accident : पुण्यात एमजी रोडजवळ अपघात; चारचाकी गाडीची सात ते आठ वाहनांना धडक

Accident News
Accident Newssakal

पुणेः पुण्यातील एमजी रोडजवळ सात ते आठ वाहनांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातामध्ये एकजण जखमी झाल्याचं वृत्त आहे.

पुण्यात एका चारचाकी गाडीने दिली ७ ते ८ गाड्यांना धडक दिली. शहरातील एमजी रोड जवळ ही घटना घडली आहे. या अपघातात इतर गाड्यांचे नुकसान झाले असून एकजण किरकोळ जखमी झाला आहे.

Accident News
Loksabha election 2024 : देशात कुणाकडे आहे सगळ्यात जास्त संपत्ती? हिंदू-मुसलमान, एससी-एसटी की ओबीसी?

प्राथमिक माहितीनुसार, एक चारचाकी पुण्यातील एमजी रोड जवळील एका रस्त्यावरून जात होती. गाडी चालवत असताना त्या चालकाला अचानक फिट आली आणि त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे समोर असलेल्या ७ ते ८ दुचाकी गाड्यांना धडक बसली. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com