esakal | पुणे : मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

पुणे : मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पैशांचे आमिष दाखवित 4 वर्षाच्या मुलीवर तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. विशेषत: या प्रकरणातील अटक केलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वारजे परिसरात शनिवारी हा प्रकार घडला.

याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी 28 वर्षीय तरुणास वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली होती. फिर्यादी महिलेची मुलगी 4 वर्षाची आहे.आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोर राहतो. त्यामुळे आरोपीची व मुलीची ओळख आहे. त्याने शुक्रवारी मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारामुळे मुलीने घाबरुन मोठमोठ्याने आरडाओरडा केला. त्यामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला. वारजे पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी तत्काळ अटक करुन पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. तो शनिवारी रात्री पोलिसांच्या तावडीतून पळून गेला.दरम्यान, वारजे पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

loading image
go to top