esakal | दौंड शहरातील आणखी पाच दुकांनावर कारवाई; कोरोना नियमांची केली पायमल्ली
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड शहरातील आणखी पाच दुकांनावर कारवाई; कोरोना नियमांची केली पायमल्ली

दौंड शहरातील आणखी पाच दुकांनावर कारवाई; कोरोना नियमांची केली पायमल्ली

sakal_logo
By
सावता नवले

कुरकुंभ : कोरोना लॉकडाऊन काळातील नियमांचे पालन न केल्याने दौंड शहरातील आणखी पाच दुकानांवरती कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदारांच्या आदेशावरून पोलिस व नगरपालिकेने ही दुकाने 30 दिवस सील करण्याची कारवाई करण्यात आली. यापूर्वी शहरातील दोन प्रतिष्ठीत व्यापाऱ्यांची दुकाने सील केली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने लॉकडाऊन जाहिर केला आहे. यासाठी शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर अत्यावश्यक सेवेत समावेश असणारी दुकाने सकाळी अकरा वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश आहेत.

हेही वाचा: रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी तरुणांची ऑनलाईन दुनियादारी

मात्र अत्यावश्यक सेवेत समावेश नसतानाही दुकाने चालू ठेवल्याने 6 मे 2021 रोजी तहसीलदार संजय पाटील यांच्या आदेशावरून पोलिस उपअधीक्षक मयुर भुजबळ व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पाच दुकाने सील करण्याची कारवाई केली आहे. ही दुकाने पुढील ३० दिवस सील केली आहे. तहसील कार्यालयाचा पुढील आदेश येईपर्यंत ही दुकाने सील राहातील. सील करण्यात आलेल्या दुकानांची नावे पुढील प्रमाणे शिवसंगम कलेक्शन, मॅगी कलेक्शन, जय मॉ कलेक्शन, अरिहंत क्लॉथ स्टोअर्स, धी दौंड क्लॉथ या पाच कपडयाच्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी प्रकाश वुलन्स दुकानावर 30 दिवस तर ट्रॉली बॉय सुपर मार्केट दुकान 15 दिवसांसाठी सील केले आहे.