police
policesakal

अवैध दारू धंद्यांवर यवतला कारवाई

हातभट्ट्यांवर कारवाई करत त्यांच्या पथकाने लाखो रुपयांचे दारू बनवण्याचे साहित्य नष्ट केले आहे.

यवत : यवत पोलिस ( police) ठाण्याची सूत्रे नुकतीच हाती घेतलेल्या पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दोनच दिवसांत अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. हातभट्ट्यांवर कारवाई करत त्यांच्या पथकाने लाखो रुपयांचे दारू बनवण्याचे साहित्य नष्ट केले आहे.

नुकतेच बदलून गेलेले पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी अवैध व्यवसाय बंद ठेवण्याचे धाडस दाखवले होते. जुगार, मटका, विदेशी मद्य, गौण खनिज यांच्या अवैध व्यवसायावर त्यांनी अंकुश ठेवला होता. अनेक अवैध व्यावसायिकांनी पाटील यांच्या बदलीसाठी प्रयत्न केले होते. काहीजणांनी तर बदलून येणाऱ्या संभाव्य अधिकाऱ्यांशी संधानही साधले होते, मात्र अनपेक्षीतपणे पोलिस निरीक्षक म्हणून नारायण पवार हे यवतला आले आणि सुरूवातीलाच अवैध व्यावसायिकांचे सारे अंदाज त्यांनी फोल ठरवले आहेत.

police
प्रेमाचा धक्कादायक शेवट! तरुण-तरुणीची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

त्यांच्या पथकाने केडगाव, वाखारी, बोरीपार्धी, चौफुला येथील दारूभट्ट्या उध्वस्त केल्या. त्यात सुमारे एक लाख पंधरा हजार रुपयांचे दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले आहे. खामगाव, नांदूर, शेलारवाडी, गाडामोडी या भागातील हातभट्ट्यांवर कारवाई करून ३ लाख रुपयांचे साहित्य नष्ट केले. याप्रकरणांत सतरा आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. सहजपूर येथील एका टॅंगोपंच विक्रेत्यावरही कारवाई करण्यात आली आहे. असे असले तरी नव्याने दाखल झालेल्या नारायण पवार यांचा उत्साह फार दिवस टिकणार नाही, या आशेवर अवैध धंदेवाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com