मतदार ओळखपत्राला जोडा आधार क्रमांक

मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी जिल्ह्यात विविध विधानसभा मतदारसंघात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
Voter ID and Aadhar Card
Voter ID and Aadhar CardSakal
Summary

मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी जिल्ह्यात विविध विधानसभा मतदारसंघात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

पुणे - मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी जिल्ह्यात विविध विधानसभा मतदारसंघात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत मतदारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.

आधार जोडणीसाठी आवश्यक नमुना अर्ज क्रमांक ६ ब भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. तसेच, मतदारांना ऑनलाइन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी ईआरओ नेट, गरुड, एनव्हीएसपी व वोटर हेल्पलाइन मोबाईल ॲप या माध्यमांवरही उपलब्ध आहे. त्याचबरोबर मतदारसंघात छापील नमुना अर्ज क्रमांक ६ ब च्या छापील प्रतींचे वाटप करण्यात येणार आहे.

आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्या वतीने ऐच्छिक असून, त्याचा तपशील गोपनीय ठेवण्यात येणार आहे. मतदारांनी मतदार ओळखपत्र व आधार क्रमांक यांची जोडणी करुन सहकार्य करावे. ही प्रक्रिया सोपी आणि सहज आहे. अधिकाधिक मतदारांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com