Pune : रस्ते जोडा वाहतूक कोंडी फोडा; तब्बल ४०१ किलोमीटरचे अविकसित रस्ते

ही गावे महापालिकेत आली असली तरी तेथे रस्त्यांचे प्रश्‍न गंभीर होत आहेत.
Pune
Pune Sakal

पुणे - शहरातील अर्धवट राहिलेले रस्ता वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी महापालिकेने अभ्यास केला. त्यात तब्बल ४०१ किलोमीटरचे अविकसित रस्ते (मिसिंग लिंक) आढळून आले आहेत. त्यातील अत्यावश्‍यक आणि कमी अंतर असणारे ३८ रस्ते निश्‍चीत झाले आहे. ११ उपनगरांमधील हे रस्ते पुढील सहा महिन्यात या रस्त्यांच्या जागा ताब्यात घेऊन ६.५ किलोमीटरचे रस्ते एकमेकांना जोडून कोंडी फोडली जाणार आहे.

Pune
Mumbai News : झोपू योजना पूर्ण करण्यास मंजुरी देण्यासाठी समिती

पुणे महापालिकेत आत्तापर्यंत १९९७, २०१७, २०२१ अशा तीन टप्प्यात हद्दीलगतची ५८ गावे समाविष्ट झाली असून, शहराचे क्षेत्रफळ ५१८ चौरस किलोमीटर इतके झाले आहे. ही गावे महापालिकेत आली असली तरी तेथे रस्त्यांचे प्रश्‍न गंभीर होत आहेत. पर्यायी मार्ग नसल्याने लहान रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे महापालिकेने गेल्यावर्षीपासून मिसिंग लिंक म्हणजे अविकसित रस्ते शोधण्याचे काम हाती घेतले होते.

त्यामध्ये ४०१.२२ किलोमीटरचे अविकसित रस्ते (मिसिंग लिंक) असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये १२८ किलोमीटरचा रस्ते हे पीएमआरडीएच्या रिंगरोडमध्ये समाविष्ट असल्याने हा भाग महापालिकेने वगळला आहे. उर्वरित २७३.२२ किलोमीटर लांबचे ३९० रस्ते महापालिकेने शोधले आहेत. हे रस्ते एकाच वेळी विकसित करणे अशक्य आहे, त्यासाठी मोठ्याप्रमाणात निधी ही लागणार आहे.

दरम्यान, महापालिकेने या केलेल्या अभ्यासात धायरी, हडपसर, वारजे, कोथरूड, बाणेर, पाषाण, औंध या शहराच्या प्रवेशद्वारावरील भागातच सर्वाधिक रस्ते अविकसित असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये धायरीतील ४० किलोमीटरचे तर हडपसर मध्ये ४५ किलोमीटरचे रस्ते अद्याप कागदावर आहेत.

प्रत्येक रस्त्यासाठी स्वतंत्र अभियंता

महापालिकेने या सर्व मिसिंग लिंकचे विश्लेषण केले असता त्यात सुरवातीच्या टप्प्यात कमी अंतर असणारे पण नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असे रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ३८ रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये २० मीटर ते ३०० मीटर लांबीचे रस्ते अर्धवट आहेत. त्यांना प्राधान्य देऊन जागा ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे.

Pune
Mumbai News : उपकर प्राप्त इमारतींतील अतिक्रमणांबाबत आता पालिका आणि म्हाडाची संयुक्त पथके

प्रत्येक रस्त्यासाठी स्वतंत्र अभियंता, रस्ता ताब्यात न येण्याची कारणे निश्‍चित करून हे प्रश्‍न एक महिना ते सहा महिन्यात मार्गी लावून रस्ते ताब्यात घेतले जाणार आहेत. तसेच यासंदर्भात विधी विभाग, भूसंपादन, बांधकाम विभाग, पथ विभाग यांच्या बैठकाही सुरू झाल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे याची जबाबदारी दिली आहे.

३८ रस्ते रस्ता रखडण्याची कारणे (कंसात रस्त्यांची संख्या)

रोख मोबदल्याचा आग्रह (८)

शासकीय जमीन ताब्यात न येणे (२)

टीडीआर, एफएसआय देणे प्रलंबित (१२)

न्यायालयीन प्रकरणे (५)

अनधिकृत बांधकाम (६)

जागा ताब्यात येण्याची लांबलेली प्रक्रिया (५)

Pune
Mumbai News : उपकर प्राप्त इमारतींतील अतिक्रमणांबाबत आता पालिका आणि म्हाडाची संयुक्त पथके

‘‘महापालिकेने शहरातील रस्त्यांचे जाळ मजबूत करण्यासाठी मिसिंग लिंकचा अभ्यास केला आहे. त्यामधील ३८ रस्त्यांची कामे पहिल्या टप्प्यात हाती घेतले आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यात या जागा ताब्यात येतील. त्यासाठी अर्थसंकल्पातील तरतूद उपलब्ध करून देऊन हे रस्ते इतर रस्त्यांना जोडले जातील.’’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

या भागातील आहेत ३८ रस्ते

हडपसर

कोंढवा

कात्रज

आंबेगाव नऱ्हे

वडगाव

कर्वेनगर

कोथरूड

सुतारवाडी

लोहगाव

खराडी

येरवडा

संपूर्ण शहरातील अशा आहेत मिसिंग लिंक

पुणे शहराची जुनी हद्द - ४८.१८ किलोमीटर

१९९७ ला समाविष्ट झालेली २३ गावे - ९२.२६ किलोमीटर

२०११ ला समाविष्ट झालेली ११गावे (आरपी) - १८० किलोमीटर

२०२१ ला समाविष्ट झालेली २३ गावे - ८०.०५ किलोमीटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com