esakal | पुणे: डेक्कन कॉलेजमध्ये अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे: डेक्कन कॉलेजमध्ये अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू

पुणे: डेक्कन कॉलेजमध्ये अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

येरवडा: डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठातील पुरातत्त्व विभागाअंतर्गत हेरिटेज साईट मॅनेजमेंट व सायंटिफिक कॉंझर्वेशन, अंडरवाटर आर्किऑलॉजी ( पाण्याखालील पुरातत्त्व ) हे पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे सुरू आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:चा व्यवसाय तसेच खाजगी व सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. असे प्रा.पी.डी. साबळे यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे: रस्त्यांच्या नशिबी कमी दराच्या निविदा!

साबळे म्हणाले, ‘‘ हेरिटेज साईट मॅनेजमेंट व सायंटिफीक कॉंझर्वेशन हा अभ्यासक्रम पुरातन वास्तुंच्याबद्दल अनेक पद्धतीने जतन व संवर्धन जाणुन घेण्यासाठी फार मोलाचे आहे. हा अभ्यासक्रम हा प्रात्याक्षिकावर आधारित आहे. ‘पाण्याखालील पुरातत्त्व ’ हा १ वर्षाचा पदविका अभ्यासक्रम गोवा येथील ‘राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान’ यांच्या सहकार्याने गेल्या सात वर्षांपासून यशस्वीरित्या चालविला जात आहे.

हा अभ्यासक्रम समुद्राच्या पाण्याखाली गेलेल्या मानवी वसाहती, मंदिरे, किल्ले, बंदरे इत्यादी मानव संस्कृतीच्या गोष्टी यासह समुद्र पुरापर्यावरण, भुरचना, भौगोलिक वैशिष्टे य त्याचा नविन तंत्रज्ञानाने होणारा अभ्यासक्रम केला जातो. या अभ्यासक्रमाच्य दुसऱ्या सत्रात गोव्याच्या किनारपट्टीवर प्रात्याक्षिकासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. ’’

हेही वाचा: Pune : शहराच्या बाजूने होणाऱ्या चक्राकार रिंगरोडला मान्यता

दोन्ही अभ्यासक्रमाचे वर्ग शनिवार व रविवार (पूर्ण दिवस) घेतले जातात. त्यामुळे इतरत्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना व इच्छुकांना हा अभ्यासक्रम सहज करता येतो. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखिल या अभ्यासक्राचा फायदा त्यांच्या रिसर्च मेथडोलॉंजी च्या क्रेडिटमध्ये गुण वाढण्यास मदत होते.

या दोन्ही अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी हा कुठल्याही विद्यापीठाचा , कुठल्याही शाखेतील पदवीधर असावा, त्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असावे, या अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी डेक्कन कॉलेज वेबसाईटवर Diploma courses मध्ये मिळेल, इच्छुकांनी ९८२२४१८६९६ संपर्क करण्याचे साबळे यांनी सांगितले.

loading image
go to top