Pune : न्यायाधीशांच्या उपस्थितीत कायदेविषयक शिबिराची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यायाधीशांच्या उपस्थितीत कायदेविषयक शिबिराची सांगता

तळेगाव ढमढेरे : न्यायाधीशांच्या उपस्थितीत कायदेविषयक शिबिराची सांगता

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिरूर तालुका विधी सेवा समितीतर्फे घेण्यात आलेल्या कायदेविषयक शिबिराची सांगता मुख्य न्यायाधीश व्ही.व्ही.कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महात्मा गांधी जयंती ते पंडित नेहरू जयंती या काळात शिरूर तालुक्यातील विविध गावामध्ये कायदेविषयक शिबिराचे आयोजन केले होते.

सांगता समारंभात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ऍड दीपक भुजबळ यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. शिरूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व्ही.व्ही.कुलकर्णी म्हणाले की, "सर्व बालकांना व नागरिकांना हक्क व कर्तव्याची जाणीव करून देणे ही सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. कोणत्याही बालकांना त्रास देणे कायद्याने गुन्हा असून, बालहक्क कायद्याने सर्वांना संरक्षण दिले आहे."

हेही वाचा: पौड : व्हायरल व्हिडीओमुळे रस्त्यावरील आजीबाईंना मिळाला सहारा

सहन्यायाधीश पी.के. करवंदे म्हणाल्या की," बालहक्क कायद्यानुसार सर्व बालकांनी बालपणाचा आनंद लुटला पाहिजे. बालकांना कोणी त्रास दिल्यास पालकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये."

ऍड अमित दोरगे यांनी "बाल मजुरी कायदा"या विषयावर बोलताना सांगितले की, "बालसंस्कार पुढील जीवनात उपयोगी पडतात. बाल मजुरीला कायद्याने बंदी घातली आहे.बालकांवरील अन्याय दूर करण्यासाठी कायद्याने संरक्षण दिले आहे.गरिबी हे बाल मजुरीचे मुख्य कारण असून, बाल मजुरीचे उच्याटन झाले पाहिजे."

यावेळी सहन्यायाधिश के.एम.मुंडे यानि शिक्षण हक्क कायदा यावर बोलताना सांगितले की, या कायद्याद्वारे बालकांना सक्तीचे व मोफत शिक्षण हक्क दिला असून, वंचित व शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे."

यावेळी ऍड अतुल ताजणे व शिरूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमकर यांनीही विविध कायदा विषयावर मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा: फास्टॅग असूनही खेड-शिवापूर टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी कायम

यावेळी न्यायाधीश आर.डी. हिंगणगावकर, ऍड शांताराम दोरगे, ऍड महेश ढमढेरे, ऍड सुदीप गुंदेचा, ऍड संपत ढमढेरे, ऍड सुरेश भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, ऍड संतोष गवारी, ऍड परेश महाजन, ऍड हर्षल भुजबळ, ऍड शहाजी पाटोळे, मुख्याध्यापक सुरेश राऊत आदी उपस्थित होते.

जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड दीपक ढमढेरे यांनी स्वागत केले. महाराष्ट्र व गोवा राज्य वकील परिषद शिस्तपालन समितीचे सदस्य ऍड सुहास ढमढेरे यांनी सूत्रसंचालन व संयोजन केले.मुख्याध्यापक जयवंत भुजबळ यांनी आभार मानले.

loading image
go to top