आत्महत्या
आत्महत्याsakal

Pune : पतीचे प्रेमप्रकरण व त्यातून होणाऱ्या भांडणाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

लोहगाव भागातील घटना; पतीला अटक

पुणे : पतीचे दुसऱ्या एका महिलेशी असलेले संबंध आणि त्यातून होणाऱ्या भांडणाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लोहगाव भागात रविवारी (ता. ३०) हा प्रकार घडला. पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पतीस विमानतळ पोलिसांनी अटक केली.

सारिका विकास शेळके (वय २६) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती विकास दामू शेळके (वय ३०, रा. पठारे वस्ती, लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सारिका यांचे वडील श्यामराव पाटील (वय ५५, रा. कोल्हापूर) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका आणि विकास यांचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

विवाहानंतर विकासचे एका महिलेशी प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती सारिकाला मिळाली. सारिकाने याबाबतची माहिती वडिलांनी दिली. विकासला नातेवाइकांनी समजावून सांगितले. महिलेशी असलेले प्रेमसंबंध तोडून टाका. संसार व्यवस्थित करा, असे विकासला नातेवाइकांनी सांगितले. मात्र त्यानंतरही विकासचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्याने दिलेल्या त्रासामुळे सारिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस उपनिरीक्षक ए. एस.. लहाने या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com