सानुग्रह अनुदानासाठी कामगार संघटनांशी करार; स्थायी समितीची मान्यता

Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal

पुणे : पुणे महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी सेवकांना पुढील पाच आर्थिक वर्षांसाठी मूळ पगार, महागाई भत्ता आणि ग्रेड पे यावर एकत्रित ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या मान्यताप्राप्त कामगार संघटनांसाठी करार करण्यास स्थायी समितीने आज (सोमवारी) मान्यता दिली, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

Pune Municipal Corporation
अकरावीसाठी शेवटची संधी, प्रवेश प्रक्रियेची तारीख पुढे ढकलली!

'सानुग्रह अनुदानसंदर्भातील महापालिका आणि कामगार संघटना यांच्यामधील करार संपला आहे. हा करार पुन्हा करण्यास व पाच वर्षात सानुग्रह अनुदानात वाढ करण्यास नुकतीच पक्षनेत्यांच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती.

स्थायी समितीने २०२१-२०२२ ते २०२४-२०२५ या कालावधीतील आर्थिक वर्षांसाठी नवीन करार करण्यास मान्यता दिली. सानुग्रह अनुदानासह दर आर्थिक म्हणजे २०२१ ला १७ हजार, २०२२ ला १९ हजार, २०२३ ला २१ हजार, २०२४ ला तेवीस हजार आणि २०२५ ला २५ हजार सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. तसेच कोरोना काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामानिमित्त प्रत्येकी तीन हजार रुपये कोविड प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.

महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, रोजंदारीवरील कर्मचारी, शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बालवाडी शिक्षिका, सेविका, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांना सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे, असे रासने यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com