Dr Baba Adhav
Dr Baba AdhavSakal

Pune: कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; ९३ व्या वर्षी डॉ.बाबा आढाव यांचा संघर्ष अटळ

अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष, कामगार नेते डॉ.बाबा आढाव यांनी दिलेला उमेदवार अंतिम मानला जातो. परंतु या निवडणुकीत हमाल पंचायतसह इतर समितीच्या सलंग्न संघटनचे उमेदवार उभे राहत बंडखोरी केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत आढाव यांना वयाच्या ९३ व्या वर्षीदेखील संघर्ष करावा लागत आहे.

पुणे - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कामगार वर्गाची अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीच्या संलग्न संघटनांमधून हमाल-मापाडी गटाच्या एका जागेसाठी तिन उमेदवार एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत.

अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष, कामगार नेते डॉ.बाबा आढाव यांनी दिलेला उमेदवार अंतिम मानला जातो. परंतु या निवडणुकीत हमाल पंचायतसह इतर समितीच्या सलंग्न संघटनचे उमेदवार उभे राहत बंडखोरी केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत आढाव यांना वयाच्या ९३ व्या वर्षीदेखील संघर्ष करावा लागत आहे.

कामगार नेते डॉ.बाबा आढाव यांनी कामगाराचे जीवनमान मार्केट यार्डातील कष्टकरी वर्गकामगारांच्या न्याय हक्कांसाठी कायमच लढा दिला आहे. मात्र, बाजार समिती निवडणूक निमित्त आयुष्यभर कामगारांसाठी संघर्ष केलेल्या डॉ. बाबा आढाव यांना पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे.

Dr Baba Adhav
Pune News : संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकरसह चारजणांविरुध्द गुन्हा

त्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात बाजार समितीच्या निवडणुकीत काही संघटना गेल्या आहेत. त्यामुळे वयाच्या ९३ व्या वर्षीदेखील त्यांनीच मोठे केलेल्या कार्यकर्त्यांविरोधात त्यांना लढा देण्याची वेळ आली आहे.

पुणे बाजार समितीच्या निवडणुकी निमित्ताने कामगार संघटनांमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे समोर आले आहे. कष्टकरी संघर्ष समितीकडून डॉ.बाबा आढाव यांनी तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरघे यांना उमेदवारी जाहिर केली. यांच्या विरोधात हमाल पंचायतचे सचिव गोरख मेंगडे तर कामगार युनियनचे संतोष नांगरे उभे आहेत.

हमाल पंचायतचे अध्यक्ष बाबा आढाव असून त्यांचेच सचिव मेंगडे हे आढाव यांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात उभे ठाकले आहेत. तर अंग मेहनती कष्टकारी संघर्ष समितीच्या संलग्न असलेली कामगार संघटना यांच्याकडून नांगरे उभे राहिल्याने कामगार संघटनांनमध्ये एक मत नसल्याचे दिसून येत आहे.

Dr Baba Adhav
Mumbai News : प्रशासकाच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाची कोंडी

अनेकांना केले मोठ

कधीही पाठीला पोते न लावणार्‍यानांही आढाव यांनी संघटनेचे नेते केले. त्यांना मोठे केले आहे. परंतु त्यांनीच आढाव यांनी दिलेल्या उमेदवाराला विरोध केला आहे. बाबा आम्हाला देवासारखे. बाबामुळेच आम्हा कष्टकऱ्यांचे आयुष्य उभे राहिले आहे. अस म्हणत संघटनेची पदे उपभोगणाऱ्यांनी मात्र बाजार समितीच्या निवडणुकीत आढाव यांना विरोध केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आढाव यांनी दिलेला उमेदवारच निवडून येतो

आतापर्यंतच्या निवडणुकात बाबा आढाव यांनी दिलेला उमेदवारच निवडून येतो हा इतिहास आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणता उमेदवार निवडून येणार हे निवडणुकीनंतरच कळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com