

Pune Ahmednagar Highway Traffic Jam Impacts Khandale Residents as Heavy Vehicles Use Narrow Roads Near the Village School
esakal
तळेगाव ढमढेरे: खंडाळे (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांना पुणे- अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका गेल्या आठवडाभरापासून बसत आहे. पुणे–अहिल्यानगर महामार्गावर वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून एमआयडीसीतील अनेक कंपन्यांच्या चारचाकी वाहने, कामगार वाहतूक करणारी वाहने तसेच जड मालवाहू टेम्पो खंडाळे गावातून पिंपरी दुमाला मार्गे रांजणगाव एमआयडीसीकडे जात आहेत.