
Pune city skyline under a clear post-Diwali sky as air pollution levels drop significantly compared to last year.
esakal
Summary
पाषाण (AQI 108) आणि निगडी (AQI 110) मध्यम श्रेणीत राहून स्थानिक फरक स्पष्ट झाला.
हिवाळ्यातील शांत वारे आणि फटाक्यांमुळे AQI वाढतो, पण यंदा तो नियंत्रणात राहिला.
C-DAC आणि IITM च्या AEQMS डेटानुसार, दिवाळीपूर्व दिवसांपासून AQI सतत सुधारला — 151 → 135 → 132.
पुण्यात दिवाळीला लक्ष्मीपूजनादिवशी हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत राहिली, मागील वर्षी हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत होती यंदा मात्र पुणेकरांना .दिवाळीला होणाऱ्या वायू प्रदुषणातून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत, पुण्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १३२ होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही लक्षणीय सुधारणा आहे,मागील वर्षी दिवाळीच्या दिवशी AQI २०१ होता, जो 'वाईट' श्रेणीत होता.