esakal | Pune: विमानतळ बंदमुळे प्रवाशांपुढे आर्थिक विघ्न!
sakal

बोलून बातमी शोधा

विमान

पुणे : विमानतळ बंदमुळे प्रवाशांपुढे आर्थिक विघ्न!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘कुटुंबासह श्रीनगरच्या सहलीचा बेत आखला. सप्टेंबर महिन्यात चौघांची विमानाची तिकिटेही काढली. सगळे काही नक्की झाले. पण पुणे विमानतळ बंद होणार असल्याची घोषणा झाली अन् आमच्या आनंदावर विरजण पडले. तब्बल ३० हजार रुपये जास्त मोजावे लागले अन् विमानाची तिकिटे री-रूट करावी लागली... ते करताना झालेला मनस्ताप हतबल करणारा ठरला,’ सांगत होते प्रवासी अनिश नहार. लोहगाव विमानतळ अचानक १५ दिवसांसाठी बंद झाल्यामुळे अनेकांच्या सहलींमध्येच नव्हे, तर दैनंदिन कामातही आर्थिक विघ्ने आली आहेत.

धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी लोहगाव विमानतळ १६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान संपूर्णतः बंद राहणार आहे. याबाबतची घोषणा ५ ऑक्टोबरला करण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या सहलींचे तसेच प्रवासाच्या वेळापत्रकाची फेररचना करावी लागली. पान ४ वर

हेही वाचा: बाधितांंना मरणानंतरही छळले ः मसणवट्यावरून राजकारण पेटले

विमानतळ दुरुस्तीचे काम एप्रिलपूर्वी किंवा दिवाळीनंतरही करता आले असते. निर्बंध शिथिल झाल्यामुळे आत्ता कोठे नागरिक बाहेर पडू लागले आहेत. परंतु, अचानक विमानतळ बंद झाल्याने पुण्यातील पर्यटन व्यवसायाचे आणि पर्यटकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

- नीलेश भन्साळी, संचालक, ट्रॅव्हल एजंट्‍स असोसिएशन ऑफ पुणे

विमानतळाची दुरुस्ती हवाई दलाकडून होणार आहे. त्यांच्याकडून आलेल्या आदेशानुसार सध्या कार्यवाही सुरू आहे. प्रवाशांच्या काही समस्या असतील तर त्यांनी संबंधित विमान वाहतूक कंपन्यांशी संपर्क साधावा. विमान कंपन्यांनीही विमानतळ प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.

- संतोष ढोके, संचालक, लोहगाव विमानतळ

लोहगाव विमानतळ बंद असल्यामुळे तुम्हाला त्रास झाला असल्यास आम्हाला त्याची माहिती तुमच्या नावासह ८४८४९७३६०२ या व्हॉट्‍सॲप क्रमांकावर कळवा.

loading image
go to top