Pune Airport : ‘डीजी यात्रे’ला प्रवाशांची पसंती; प्रवाशांना अवघ्या काही सेकंदांत मिळणार टर्मिनलवर प्रवेश

पुणे विमानतळावर ‘डीजी यात्रेचा’ वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. सुमारे ५७ टक्के प्रवासी ‘डीजी यात्रेचा’ वापर करीत असल्याने या यात्रेला चांगला प्रतिसाद लाभत आहे.
Pune Airport
Pune Airportsakal

पुणे - पुणे विमानतळावर ‘डीजी यात्रेचा’ वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. सुमारे ५७ टक्के प्रवासी ‘डीजी यात्रेचा’ वापर करीत असल्याने या यात्रेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. ‘इंडिगो’ने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

प्रवाशांना टर्मिनलवर जाण्यासाठी रांगा लावाव्या लागू नये, म्हणून पुणे विमानतळ प्रशासनाने ३१ मार्च २०२३ पासून दोन्ही टर्मिनल गेट स्कॅनर मशिन बसविले. चार हजार प्रवाशांची चाचणी झाल्यावर डीजी यात्रा सेवा सुरू केली. सुरुवातीच्या काळात प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद होता. तर काही विमान कंपन्यांनीदेखील याला प्रतिसाद दिला नव्हता.

नंतर प्रवासी व विमान कंपनी देखील डीजी यात्रेला प्राधान्य दिले. प्रवाशांना अवघ्या काही सेकंदांत टर्मिनलवर प्रवेश मिळत असल्याने वेळेत बचत होत आहे. प्रवाशांना चेक इनसाठी रांगेत वाट पाहत थांबण्याची गरज भासत नाही. त्यामुळे ‘डीजी यात्रा’ ही सेवा घेणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे.

हे कसे काम करते

  • प्रवासापूर्वीच प्रवाशांनी डीजीयात्रा हे ॲप डाऊनलोड करावे.

  • प्रवाशांना आधार क्रमांक लिंक करून त्याचे सर्व तपशील डीजी यात्रा अॅपवर त्यांचे तपशील नोंदवावे

  • स्वतःचा फोटो अपलोड करावा. बायोमेट्रिक तपशील घेतले जातील.

  • अॅपमध्ये नोंदणीनंतर प्रवाशांना चेक-इनसाठी वेळ लागणार नाही.

  • टर्मिनलच्या बाहेरच्या बाजूला बसविलेल्या स्कॅनरसमोर प्रवाशांचा चेहरा स्कॅन होईल.

  • त्यानंतर सीआयएसएफचे जवान प्रवाशांचे स्‍कॅन केलेले छायाचित्र आणि तिकिटाची पडताळणी करतील.

  • या प्रणालीद्वारे बनावट तिकीट किंवा दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवेश करू पाहणाऱ्यांना रोखता येते.

अशी आहे माहिती

  • पुणे टर्मिनल निर्गमन एकूण प्रवासी - ११,७७५

  • इंडिगो - ४९१८

  • विस्तारा - ३५१

  • स्पाईस जेट - ५०२

  • एअर इंडिया - ४५३

  • अकासा - ४५२

  • एकूण प्रवासी - ६६७६ (डीजी यात्रा )

(ही आकडेवारी मागच्या आठवड्यातील शुक्रवारची )

याचा फायदा काय

  • डीजी यात्रा ही सुविधा सुरू झाल्यावर प्रवाशांना रांगेत थांबावे लागणार नाही.

  • एक ते दोन मिनिटांत ही सर्व प्रक्रिया पार पाडेल.

  • ‘सीआयएसएफ’ वरचा ताण हलका होईल

पुणे विमानतळावर डीजी यात्रा सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. एकूण प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत ५७ टक्के प्रवासी ‘डीजी यात्रा’चा वापर करीत आहे. या सुविधेमुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होत आहे.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com