

Pune Airport Set for Expansion; 40-Acre Defence Land Key to Future Development
sakal
पुणे: पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. विस्तारीकरणासाठी एकूण ३०० एकर जागेची आवश्यकता असून, त्यातील संरक्षण दलाची ४० एकर जागा मिळवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. या जागेच्या हस्तांतरणासाठी संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चेला सुरुवात झाली असून, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यासाठी पाठपुरावा करीत आहेत.