

Pilots Refuse Takeoff over Duty Hours
Sakal
पुणे : ‘माझ्या कामाचे तास संपले आहे. मी पुढील उड्डाण करणार नाही,’ असे सांगून दोन वैमानिकांनी उड्डाणास नकार दिला. त्यामुळे पुणे-दिल्ली व पुणे-अमृतसर विमानाला तीन तासांपेक्षा अधिक विलंब झाला. प्रवाशांनी संताप व्यक्त केल्यानंतर विमान कंपनीने अन्य वैमानिकाचा शोध घेतला. वैमानिक आल्यानंतर उड्डाण झाले. विमानाला उशीर झाल्याने पुणे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.