

Pune Airport leopard
esakal
एप्रिल २०२५ पासून हा बिबट्या विमानतळाच्या संवेदनशील भागात फिरत होता. तो भूमिगत बोगदे, दाट झुडपे आणि मानवी वावर कमी असलेल्या भागांचा आधार घेऊन विमानतळात प्रवेश करत होता आणि बाहेर पडत होता. विमानतळाच्या विस्तीर्ण आणि अत्यंत सुरक्षित क्षेत्रामुळे त्याला पकडणे अत्यंत क्लिष्ट काम होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोहीमेत अनेक तांत्रिक अडथळे आणि जोखीम होती.