

Wildlife Incidents Aviation Security
Sakal
पुणे : पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्याचे वारंवार दर्शन घडल्यानंतर विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. यात शिडीची (लॅडर) सेवा बंद केली आहे. तसेच, ऍप्रन सुरक्षा पथकाला दर अर्ध्या तासांनी प्रवासी असलेल्या भागांत गस्त घालण्याचे आदेश दिला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही महत्त्वाच्या ठिकाणी विजेची व्यवस्था केली आहे. शिवाय ऍप्रनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकट्याने न जाण्याच्या सूचना विमानतळ प्रशासनाने दिल्या आहेत.