

Leopard Sighted Near Pune Airport Runway
Sakal
प्रसाद कानडे
पुणे : पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ (टॅक्सी वे क्रमांक के -४) गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास पुन्हा बिबट्या आढळून आला. गेल्या दोन दिवसांत दोन वेळा बिबट्याचे दर्शन येथे घडले आहे. पुणे विमानतळावरून विमानांची सर्वांत जास्त वाहतूक ही रात्रीच्या वेळी होते. बिबट्या ज्या ठिकाणी आढळून आला, त्या ठिकाणाहून काही अंतरावरच पार्किंग बे क्रमांक ८, ९ व १० आहेत. रात्रीच्या वेळी या तिन्ही बेवर विमाने थांबली होती. सुदैवाने बिबट्या धावपट्टीवर आला नाही.