Pune News : पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या कामाचा आढावा; ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट; दोन-तीन आठवड्यांत उद्‌घाटन

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले असून काही कामांबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
 पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या कामाचा आढावा
पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या कामाचा आढावाSakal

Pune News : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले असून काही कामांबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. ही कामे झाल्यानंतर आढावा घेतला जाईल. येत्या दोन ते तीन आठवड्यांत उद््घाटन होईल,

अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. टर्मिनलचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे म्हणून प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

शिंदे यांनी शुक्रवारी नव्या टर्मिनलच्या मुख्य इमारतीचा पाहणी केली. इमारतीच्या बाहेरील परिसरात फिरून त्यांनी कामांचा आढावा घेतला. या वेळी विमानतळ संचालक संतोष ढोके यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिंदे यांच्या सूचना

नागपूरहून पुणे विमानतळावर दाखल होताच शिंदे नव्या टर्मिनलच्या इमारतीत दाखल झाले. तेथे लावण्यात आलेले सायनेज बोर्ड ठीक नसल्याचे त्यांना आढळून आले. तसेच काही छायाचित्रांच्या फ्रेम खराब झाल्याचे निदर्शनास आले.

त्याबाबत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ‘ताबडतोब याची दुरुस्ती करा. स्वच्छता ठेवा. येत्या दोन-तीन दिवसांत सुचविलेल्या बदलांची अंमलबजावणी झाली पाहिजे,’ अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

नव्या टर्मिनलचे फायदे

  • सध्याच्या टर्मिनल मधून ९० विमानांचे उड्डाण व लँडिंग

  • दिवसभरात २० ते २२ हजार प्रवाशांची वाहतूक होते

  • नव्या टर्मिनलवरून रोज १२० विमानांचे उड्डाण आणि लँडिंगची क्षमता

  • दिवसभरात ३२ ते ३३ हजार प्रवाशांच्या वाहतुकीचा अंदाज

असे आहे नवे टर्मिनल

  • चेक इन काऊंटर : ३४

  • गेट : ६ (आगमन व निर्गमन)

  • बॅगेज बेल्ट : ५

  • एरोब्रिज : ५

  • पहिला मजला : सेक्युरिटी होल्ड एरिया

  • बोर्डिंग ब्रिज : ५

  • क्षेत्रफळ : ५२ हजार चौरस फूट

  • प्रवासी क्षमता : वर्षाला एक कोटी २० लाख

  • एकूण खर्च : ४७५ कोटी

  • तासाला : २३०० प्रवाशांची क्षमता.

  • कनेक्टिव्हिटी : ३७ शहरे

प्रवाशांना मिळणार या सुविधा

  • प्रवाशांची गर्दी नियंत्रणासाठी सेन्सरचा वापर

  • प्रवाशांच्या बॅगेज चेक करण्याचा वेळ वाचावा म्हणून नव्या इन लाइव्ह बॅगेज प्रणालीचा वापर. यामुळे प्रवाशांना रांग लावावी लागणार नाही, तसेच या प्रणालीमुळे एक्स रे मशिनमधून बॅग बेल्टवर घेऊन जावे लागणार नाही. हे काम नवीन मशिन करेल. परिणामी प्रवाशांच्या वेळेत बचत होईल

  • प्रवाशांना आराम करण्यासाठी लाउंज यात एक कमर्शिअल लाउंजचादेखील समावेश आहे

  • कार्बन फूट प्रिंट कमी करण्यासाठी विमानतळावर स्काय लाइटचा वापर

  • लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

  • रेस्टॉरंट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com