

Pune Police Finalize New One-Way Traffic Rules Near Airport
Sakal
पुणे : विमानतळ परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने तात्पुरत्या प्रयोगानंतर दोन मार्गांवर एकेरी वाहतूक सुरू करण्याबाबत अंतिम अधिसूचना काढली आहे. नवीन नियमानुसार काही मार्गांवरील पूर्वीचे निर्बंध रद्द करण्यात आले आहेत. विमानतळ वाहतूक विभागांतर्गत १५ नोव्हेंबर रोजी प्राथमिक अधिसूचनेवर प्राप्त हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यांचा विचार करून पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी एक डिसेंबर रोजी अंतिम अधिसूचना काढली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनचालकांना नवीन नियमांचे पालन करणे अनिवार्य राहील.