Pune Airport : विमानांची संख्या वाढण्यास लागणार महिना; मराठमोळ्या संस्कृतीचे होणार दर्शन

पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. प्रवाशांसाठी आवश्यक सर्व सुविधांची उपलब्धता झाली आहे.
Pune Airport
Pune AirportSakal

- प्रसाद कानडे

पुणे - पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. प्रवाशांसाठी आवश्यक सर्व सुविधांची उपलब्धता झाली आहे. मात्र सायनेज बोर्ड, टर्मिनलच्या बाहेर पडणाऱ्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. या टर्मिनलवरून दररोज सुमारे १२० विमानांची उड्डाणे होणार आहेत. टर्मिनलचे उद्घाटन झाल्यानंतरच वाहतूक सुरू होईल. उद्घाटनासाठी आणखी किमान महिना लागण्याची शक्यता आहे.

प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा या टर्मिनलमध्ये मिळतील. टर्मिनलच्या प्रवेशद्वारावरच कोल्हापुरातील भवानी मंडप, न्यू पॅलेस यांच्या प्रतिकृती साकारण्याचे काम सुरू आहे. तसेच इमारतीच्या बाहेरील बाजूस पुण्याच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेला शनिवार वाडा, गणेशोत्सव आदी चित्रे रेखाटली आहेत. नव्या टर्मिनलवरून प्रवास करताना प्रवाशांना मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.

नव्या टर्मिनलच्या उद््घाटनाची अद्याप तारीख ठरलेली नाही. मात्र आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. काही छोटी-मोठी कामे शिल्लक असून ती लवकरच पूर्ण होतील.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

प्रवाशांना मिळणार या सुविधा

  • गर्दी नियंत्रणासाठी सेन्सर

  • प्रवाशांचे साहित्य तपासण्यासाठी वेळ वाचावा म्हणून नवी प्रणाली. यामुळे प्रवाशांना रांग लावावी लागणार नाही. तसेच या प्रणालीमुळे साहित्य एक्स रे मशिनमधून बेल्टवर घेऊन जावे लागणार नाही. हे काम नवीन मशिन करेल.

  • प्रवाशांना आराम करण्यासाठी कक्ष.

  • कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी विमानतळावर स्काय लाइटचा वापर.

  • लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

  • उपहारगृह

सुरू असलेली कामे

  • सायनेज बोर्ड बसविणे, टर्मिनलमधील स्वच्छता

  • टर्मिनलमध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या रस्त्यांची कामे

  • भवानी मंडप, न्यू पॅलेसच्या सहा प्रतिकृती साकारणे

प्रवासी संख्या १० हजारांनी वाढणार

  • सध्याच्या टर्मिनलमधून ९० विमानांचे उड्डाण व लँडिंग

  • दिवसभरात २० ते २२ हजार प्रवाशांची वाहतूक

  • नव्या टर्मिनलवरून दररोज १२० विमानांचे उड्डाण व लँडिंग

  • दिवसभरात ३२ ते ३३ हजार प्रवाशांची वाहतूक होईल

  • विमानांची संख्या ३० तर प्रवाशांची संख्या १० हजारांनी वाढेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com