Plane Service : हिवाळी मोसमात एकच नवी विमानसेवा; अन्य नव्या शहरांसाठी सेवा नाही

पुणे विमानतळाचा हिवाळी मोसम (विंटर शेड्यूल) उद्यापासून (ता. २९) सुरू होत आहे. यंदा केवळ एक नवी विमानसेवा सुरू होत आहे.
Pune Plane Service
Pune Plane Servicesakal

पुणे - पुणे विमानतळाचा हिवाळी मोसम (विंटर शेड्यूल) उद्यापासून (ता. २९) सुरू होत आहे. यंदा केवळ एक नवी विमानसेवा सुरू होत आहे. पुण्याहून किशनगडला प्रथमच विमानसेवा सुरू होईल. कंपन्यांच्या प्रतिसादाअभावी नव्या शहरांना जोडण्याचा प्रयत्न यंदाही अपयशी ठरला. पुण्याहून बेळगाव, नाशिकसह अन्य शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी होती, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही.

यंदा प्रशासनाने प्रवाशांची सोय व्हावी, शहरांशी ‘कनेक्टिव्हिटी’ वाढावी म्हणून ‘स्लॉट’ची संख्या वाढवली आहे. सोमवार ते शुक्रवारदरम्यान २१८, शनिवारी २२० तर रविवारी २४७ ‘स्लॉट’ उपलब्ध झाले आहेत. मात्र कंपन्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळी हंगाम पर्यटनासाठी चांगला मानला जातो. त्यामुळे प्रशासन या काळातच हिवाळी मोसम आखते. यात विमानांची संख्या वाढविण्यावर भर असतो. या मोसमात पुण्याहून सोमवार ते शुक्रवार दरम्यान २१८ विमानांची वाहतूक होईल असे नियोजन आहे. मात्र प्रत्यक्षात २०० विमानांची वाहतूक होईल. दैनंदिन प्रवाशांची संख्या ४० हजारच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

विमान कंपन्यांनी मेट्रो शहरांसाठी सेवा देण्यावर भर दिला आहे. हिवाळी मोसमात रोजची उड्डाणे १०० पेक्षा जास्त होणार नाहीत. ‘उडान’ योजनेतही एक किंवा दोन शहरांसाठी सेवा सुरू होईल.

हवाई दलाचा नकार

विमानतळावर दिवसा तासाला प्रत्येकी पाच ‘टेक ऑफ’ आणि पाच ‘लँडिंग’ असे १० स्लॉट आहेत. रात्री तासाला प्रत्येकी सात ‘टेक ऑफ’ आणि सात ‘लँडिंग’होतात. विमानतळ प्रशासनाने हवाई दलाकडे दिवसा तासाला २० ‘स्लॉट’ची मागणी केली होती, मात्र हवाई दलाने त्यांच्या विमानांची वाहतूक लक्षात घेऊन हा प्रस्ताव नाकारला.

हिवाळी वेळापत्रक रविवारपासून सुरू होत आहे. यात विमानांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. ‘स्लॉट’ची संख्यादेखील मुबलक आहे.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com