Pune Airport : विमानापर्यंतचा प्रवास कासवगतीने! सुविधा कोलमडल्या; विमानतळावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी

पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवरून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक होत आहे.
pune airport passengers
pune airport passengerssakal

- प्रसाद कानडे

पुणे - पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवरून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक होत आहे. टर्मिनलची प्रवासी वहन क्षमता वर्षाला सुमारे ७१ लाख इतकी आहे. मात्र २०२३ या वर्षात ८० लाखांहून अधिक प्रवासी वाहतूक झाली आहे. क्षमतेपेक्षा २८ टक्के जास्त प्रवासी वाहतूक होत असल्याने त्याचा परिणाम प्रवासी सुविधांवर होताना दिसत आहे. चेक इन काउंटरच्या रांगा ते पॅसेंजर लाउंजमध्ये होणारी गर्दी यासह अन्य सुविधांवरदेखील याचा परिणाम होत आहे.

गेल्या काही दिवसांत पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र त्या तुलनेत सुविधांमध्ये वाढ झालेली नाही. विमान कंपन्या नफेखोरी वाढविण्यासाठी विमानांची संख्या वाढवत आहेत. यातून विमानतळाचेदेखील उत्पन्न वाढते. मात्र प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांवर मर्यादा येत आहेत. त्याकडे ना विमानतळ प्रशासन लक्ष देत आहे, ना विमान कंपन्या. सामान्य प्रवासी मात्र गैरसोयींचा सामना करत आहेत.

असा होतोय परिणाम

  • टर्मिनलच्या आवारात गर्दी वाढणे. ओला-उबेरच्या वाहनांना पिकअपसाठी परवानगी नाही.

  • चेक इन काउंटर, सेक्युरिटी चेकसाठी प्रवाशांच्या रांगा लागतात.

  • बॅगेज स्क्रीनिंगलादेखील उशीर

  • पॅसेंजर लाउंजमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी

  • अशातच विमानाला उशीर झाला अथवा रद्द झाले तर मग स्थिती आणखीन कठीण

  • एखादा प्रवासी विमानतळावर उशिरा पोहचला तर गर्दीमुळे त्याला विमानापर्यंत पोहचणे अवघड

  • प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था तोकडी

  • स्वच्छतागृह लवकर उपलब्ध न होणे, टर्मिनलमध्ये अस्वछता

अशी आहे स्थिती

  • दैनंदिन प्रवासीसंख्या - सुमारे ३० हजार

  • विमानांचे उड्डाण - सरासरी ९० ते ९२

  • एकूण विमानांची वाहतूक - १८० ते १८४

टर्मिनलमध्ये प्रवाशांची गर्दी झाल्यावर त्याचे विभाजन केले जाते. चेक इनसाठी रांग लागू नये म्हणून ‘डीजी यात्रा’सारखी सुविधा उपलब्ध आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

क्षमतेपेक्षा जास्त विमानांचे उड्डाण केल्यावर त्याचा नक्कीच विपरीत परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे. मुंबईत‘डीजीसीए’ने विमानांचे उड्डाण कमी करण्याचा निर्णय घेतला, तसा पुण्यातदेखील घेतला पाहिजे.

- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com