Pune Akashvani : पुणे आकाशवाणीच्या बातम्या सुरूच राहणार; वृत्त विभाग बंद न करण्याचा केंद्राचा निर्णय

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरूच; पत्रकार संघाच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारकडून बातम्या बंद न करण्याची हमी
Journalist Union Advocacy Grid: Pune Shramik Patrakar Sangh Submits a Grievance Memorandum

Journalist Union Advocacy Grid: Pune Shramik Patrakar Sangh Submits a Grievance Memorandum

Sakal

Updated on

पुणे : पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद करण्याच्या हालचाली सुरु असताना हा वृत्त विभाग बंद करू नये यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मागणी केली होती. त्‍यावर आज पुण्यात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत मोहोळ यांची बैठक झाली. त्यात वस्तूस्थिती समजून घेत वैष्णव यांनी हा वृत्त विभाग बंद होणार नाही. ठरलेल्या वेळेप्रमाणे बातम्यांचे प्रसारण सुरु राहील असे स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com