Pune Dams Water Level : पुणेकरांसाठी मोठी बातमी! चारही धरणे 100% भरली; पण आज 'या' भागात पाणीच नाही

All Four Pune Dams Reach Full Capacity as Water Supply Relief Comes Amid Temporary Water Cut : पुण्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे १०० टक्के भरल्याने दिलासा मिळाला असून, आज पश्चिम पुण्यातील अनेक भागांत पाच तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Pune Dams Water Level

pune dam

esakal

Updated on

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे शंभर टक्के भरल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने रिपरिप स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. यंदाचा धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १२ टक्क्यांनी अधिक असल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com