Pune: खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची सोशल मिडियावरही दुहेरी भुमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार डॉ. अमोल कोल्हे

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची सोशल मिडियावरही दुहेरी भुमिका

केसनंद : चित्रपट तसेच मालिकेत विविध भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेते तसेच शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अशी दुहेरी भुमिका पार पाडताना दिसतात. याबाबत ‘अभिनेता कि नेता...याविषयावर सोशल मिडियावर ट्रोलरला सणसणीत उत्तर देताना डॉ.अमोल कोल्हेंनी आपली भुमिका परखडपणे स्पष्ट केली आहे. फेसबुक राजकारणासाठी तर इंस्टाग्राम अभिनयासाठी...असा निर्णय जाहीर करीत त्यांनी नवा पर्यायही दिला आहे. त्यामुळे यापुढे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची सोशल मिडियावरही दुहेरी भुमिका नेटकऱ्यांना पहावयास मिळणार आहे.

याबाबत त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, इन्स्टाग्रामवर नजर टाकताना अनेकदा निदर्शनास आलं की पोस्टवर प्रतिक्रिया देताना "अभिनेता" की "नेता"अशी अनेकांची गल्लत होते. राजकीय भूमिका प्रत्येकाची वेगळी असू शकते पण ती भूमिका पडद्यावरील, समाजमाध्यमावरील भूमिकेच्या आड येऊ नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळेच मी एक निर्णय घेतला आहे- इन्स्टाग्रामवर इथे राजकीय पोस्ट करायची नाही. म्हणजे कन्फ्युजन नको.

हेही वाचा: शरद पवारांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त मोफत शिवभोजन थाळी

राजकीय पोस्ट साठी फेसबुक पेज आहेच. चालेल ना ? याबरोबरच त्यांनी खाली एक टीपही टाकली आहे. यात ते म्हणतात, जबाबदार नागरिकाच्या भूमिकेतून मांडलेल्या विचाराला राजकीय भूमिका समजण्यात येऊ नये.

अखेर अभिनय आणि राजकारणात गल्लत करु नका…असेच सुनावत खासदार डॉ. कोल्हे यांनी ट्रोलरला सनसनीत टोलाच लगावला आहे....! डॉ. कोल्हे यांच्या या नव्या निर्णयाला बहुतांश नेटकऱ्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsAmol Kolhe
loading image
go to top