esakal | pune कोथरूड मध्ये विविध चौकात प्रेरणादायी शिल्प
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न बजावणारे कोरोना योद्धा सन्मान

Pune: कोथरूड मध्ये विविध चौकात प्रेरणादायी शिल्प

sakal_logo
By
समाधान काटे

पुणे : पुणे महापालिकेच्या माध्यमातून कोथरूड मधील विविध चौकामध्ये कोणत्याही राजकीय नेत्यांचे पुतळे न उभारता प्रेरणादायी शिल्प उभा करण्यात आले आहेत. कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस सेवा बजावणारे पोलिस, डॉक्टर,परिचारिका ( नर्स), स्वच्छता सेवक यांचा कोरोना योद्धा सन्मान कायम राहावा म्हणून चार योद्ध्यांचे शिल्प कै निळू फुले उद्यानासमोर समोर मयुर कॉलनी येथे आरोग्य सेवेला प्रेरणा देणारे ठरत आहे. आपल्या देशातील नागरिक सुरक्षित राहावे यासाठी जवान आपल्या भारत देशाचे रक्षण करतात.

हेही वाचा: मला ईडीची नोटीस पाठवणाऱ्या भाजपला लोकांनी वेडी ठरवलं - पवार

त्यांच्यामुळेच देशातील नागरिक सुरक्षित, सुखाने, आनंदाने आणि उत्साहात जीवन जगतात,त्यांच्या प्रति शौर्याचे प्रतिक म्हणून तिरंगा ध्वज उभारतानाचे सैनिका़ंचे शिल्प डिपी रस्ता,बधाई चौकामध्ये दिमाखात उभे असून" न झुकने दिया तिरंगे को न युध्द कभी ये हारे हैं, भारत माता तेरे वीरों ने दुश्मन चुन चुन कर मारे हैं" असा संदेश देत,

हे देशसेवेचे शिल्प रात्री रोषणाईने आकर्षक ठरत आहे. डहाणूकर कॉलनीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, स्वामी विवेकानंद यांचे समाजाला दिशा देणारे विचार, संदेश मनामध्ये ऊर्जा,देश प्रेम जागवतात.

"सैनिकाचे शिल्प असो अथवा इतर प्रेरणादायी कोणतेही शिल्प येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्या विचारातून, संकल्पनेतून हे शिल्प उभा करण्यात आले आहेत".

- सचिन तामखेडे, सहायक आयुक्त कोथरूड क्षेत्रीय कार्यालय.

loading image
go to top