esakal | Nagpur: सणासुदीच्या दिवसांत वेतन उशिरा? कामगारांमध्ये नैराश्‍येचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

अनियमीत वेतन

नागपूर : सणासुदीच्या दिवसांत वेतन उशिरा? कामगारांमध्ये नैराश्‍येचे वातावरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खापरखेडा (जि. नागपूर) : खापरखेडा येथे २१० मेगावॅटचे चार संच आणि ५०० मेगावॅटचा एक संच असे दोन वीज निर्मिती केंद्र सुरू आहेत. या दोन्ही वीजनिर्मिती केंद्रात जवळपास अडीच हजार कंत्राटी कामगार काम करीत असतात. अगदी दसरा-दिवाळी सणासुदीच्या वेळी कंत्राटी कामगारांचे वेतन उशिरा होत असल्याने कंत्राटी कामगारांत चिंतेचे सावट पसरले.

महाजनको प्रशासनाकडे फंड नसल्याचे कारण समोर येत असल्याची चर्चा कामगार वर्तुळात होत आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा होणारा पगार विलंबाने करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाजेनकोकडे फंड नसल्याने अनेक कंत्राटदाराची देयके बिल थकीत आहेत. कंत्राटदाराची थकीत बिले मिळाली नसल्यामुळे कंत्राटी कामगारांचे वेतन विलंबाने होत असल्याने कंत्राटी कामगारांत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. महाजेनकोच्या नियमित कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी शासनाकडे फंड असतोच, मात्र कंत्राटदारांना महाजेनकोकडून देय असलेली बिले मिळाली नसल्याने कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न समोर आला. वीज केंद्राच्या निर्मितीकरिता कंत्राटी कामगारांची महत्त्वाची भूमिका असून अनेक विभागातील काही पॉईंट कंत्राटी कामगारांच्या भरोशावर चालविले जातात.

हेही वाचा: औरंगाबादेत बंधाऱ्यात कार बुडाली,एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

इतक्या जोखमीचे काम करीत असतानाही सणासुदीच्या महिन्याचा पगार वेळेवर होत नसल्याने कंत्राटी कामगारांवर संकट ओढवले आहे. एकीकडे दर महिन्याला दहा तारखेच्या आत होणारा पगार विलंबाने होणार आहे. विशेष म्हणजे अनेक काही कंत्राटी कामगारांनी विविध बँकेतून सोसायटी अथवा अन्य प्रतिष्ठानातून वस्तू, गाडी, घर, प्लॉट आदींवर कर्ज घेऊन खरेदी केली आहे. त्या कर्जाच्या परतफेडीचे हप्ते पगारावर अवलंबून आहे. या महिन्याचे वेतन उशिरा होत असल्याने अनेकांचा कर्जाचा परतफेडीचे चेक बाउन्स होऊन ‘पेनॉल्टी’ भरण्याची वेळ आली. इतकेच नव्हे तर त्या संबंधित कंत्राटी कामगारांचे सिविल रेकॉर्ड सुद्धा खराब होत असल्याने कधीकाळी कर्ज मिळण्याची त्यांची संधीच संपुष्टात येवू लागली.

सणासुदीच्या महिन्यात कंत्राटी कामगारासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. हजारो कंत्राटी कामगारांचा उदरनिर्वाह महिन्याच्या पगारावर अवलंबून असतो. काही कंत्राटदार दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत पगार करीत नसतात. अशा वेळीही वेतन वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटी कामगारांना घर भाडे, मुलाच्या शिक्षणाचा व इतर खर्च कर्ज घेऊन केल्यास अडचणी निर्माण होत असतात.सणासुदीचा महिन्यात कंत्राटी कामगारांचा पगार चार-पाच दिवसांचा आत झाला नाही तर कंत्राटी कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: बाधितांंना मरणानंतरही छळले ः मसणवट्यावरून राजकारण पेटले

संबंधित प्रशासनाच्या नियमानुसार कंत्राटदाराची देयके बिल ४५ दिवसांच्या आत मिळणे अपेक्षित आहे. मात्र महाजनकोकडे तीन तीन महिन्याचा कालावधी होत असतानाही कंत्राटदाराचे थकीत बिल मिळाले नाहीत. त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या मासिक वेतनाला थोडाफार उशीर होण्याची शक्यता आहे.

-दिवाकर घेर कंत्राटदार संघटनेचे महासचिव

loading image
go to top