Pune : स्वारगेट पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्यावर लाचखोरी बद्दल कारवाई

स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू
Pune anti corruption department
Pune anti corruption department

धायरी : महानगरपालिकेच्या स्वारगेट पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारल्या प्रकरणी कारवाई केली. स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकसेवक व्यंकटेश लक्ष्मण पाटील (वय ४० वर्षे, कनिष्ठ अभियंता, नेमणूक स्वारगेट पाणीपुरवठा विभाग, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. मागणी केलेली लाचेची रक्कम तीस हजार रुपये घेताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

तक्रारदार हे ठेकेदार असून, पुणे महानगरपालिका स्वारगेट पाणी पाणी पुरवठा विभागातील धायरी परिसरातील पाण्याविषयक केलेल्या कामांचे प्रलंबित असलेले सुमारे चार लाख रुपयांचे देयक मंजूर करून देण्यासाठी लाच मागणी केल्याची तकार आहे.

धायरी प्रभाग क्र. ३३ व ३३ क परिसरामध्ये तक्रारदार यांनी पाण्यासाठी केलेल्या कामांचे प्रलंबित असलेले देयक मंजूर करून देण्यासाठी व्यंकटेश पाटील याने तक्रारदारांकडे ३० हजार रूपयांची मागणी करून ती घेतली याची पडताळणी केल्यानंतर कारवाई करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com