पुण्याच्या अर्णवीचा स्केटिंग मध्ये विश्वविक्रम

अर्णविचे वडिल मंदार पाटसकर यांनीही त्यांच्या मुलीसाठी खूप मेहनत घेतली मंदार पाटसकर हे गेली १२ वर्षे पुण्यामध्ये स्थायिक आहेत
pune
punesakal media

महर्षी नगर : पुण्यातील कोंढवा भागात राहणारी अर्णवि मंदार पाटसकर हिने बेळगाव येथे झालेल्या सलग ८१ तासाच्या स्केटिंग वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सहभाग घेऊन ९ बुक्स ऑफ रेकॉर्ड केला, या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून २२० मुलांनी सहभाग घेतला होता, ८१ तासात १०हजार ११६ फेऱ्या मारून नवीन विक्रम केला. त्यासाठी त्याने रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमी कात्रज पुणे येथे अवघ्या ३ महिने स्केटिंग चे प्रशिक्षण घेतले असून प्रशिक्षक विजय मलजी यांनी तिची निवड करून स्केटिंग वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सहभाग घ्यायला लावला.

pune
'सोमेश्वर'च्या सभासदांनी अजित पवारांचं आवाहन खरं करुन दाखवलं

अर्णविचे वडिल मंदार पाटसकर यांनीही त्यांच्या मुलीसाठी खूप मेहनत घेतली. मंदार पाटसकर हे गेली १२ वर्षे पुण्यामध्ये स्थायिक आहेत. ते म्हणाले अर्णविला वयाच्या अडीच वर्षांपासून स्केटिंग मध्ये आवड निर्माण झाली. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये अर्णविने अनेक स्केटिंग च्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यश संपादन केले. मागच्या महिन्यात म्हणजेच २७ ते ३० सप्टेंबर २०२१ ला बेळगाव कर्नाटक येथे झालेल्या स्पर्धेत अर्णवि मंदार पाटसकर हीने आणखी एक नवीन विक्रमाची नोंद केली होती.

pune
कामगारमंत्री मुश्रिफांच्या घरावर काढणार 50 हजार कामगांराचा मोर्चा!

अर्णवीची राष्ट्रीय स्तरावर निवड

९ ऑक्टोबर २०२१ रोजी खोपोली येथे पार पडलेल्या रूलर गेम रोलर स्केटिंग महाराष्ट्र स्टेट चॅम्पियन्सशिप मध्ये अर्णवि मंदार पाटसकर हिने ब्रँझ मेडल आणि सन्मानपत्र मिळवले, त्यातून तिचे बेळगाव येथे आयोजित केलेल्या नॅशनल लेवल स्केटिंग स्पर्ध्येमध्ये निवड झाली आहे. आता ती महाराष्ट्र राज्याला स्केटिंग स्पर्धेत नॅशनल स्तरावर प्रस्तुत करेल. हडपसर मतदारसंघ माजी आमदार योगेश टिळेकर यांनी तिचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com