पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन वेश्‍याव्यवसायास भाग पाडणाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला वेश्‍याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली. आरोपी तीन वर्षांपासून फरारी असून तो सातत्याने गुंगारा देत होता, अखेर पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या. 

पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला वेश्‍याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली. आरोपी तीन वर्षांपासून फरारी असून तो सातत्याने गुंगारा देत होता, अखेर पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या. 

टिपू सामसुर गांझी (वय 30, रा. शुक्रवार पेठ) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर आकाश दिलेर मुल्ला यास यापुर्वीच अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुल्ला व टिपू हे दोघेही मुळचे पश्‍चिम बंगाल येथील आहेत. मुल्ला याने पश्‍चिम बंगालमधीलच एका अल्पवयीन मुलीसमवेत प्रेमसंबंध निर्माण करुन तिला पुण्याला आणले. त्यानंतर त्याने व टिपू या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला वेश्‍याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुल्ला यास अटक केली. तर टिपू हा फरारी झाला होता. 

टिपू त्याचे वास्तव्याचे ठिकाण सातत्याने बदलत असल्याने आणि त्याची केवळ नावापुरतीच माहिती पोलिसांकडे उपलब्ध असल्याने पोलिसांना त्यास अटक करणे जिकीरीचे जात होते. दरम्यान, पोलिस कर्मचारी रमेश चौधर व निलेश शिवतरे यांना टिपू बुधवार पेठेतील क्रांती चौकामध्ये येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, सहाय्यक पोलिस उपायुक्त भानुप्रताप बर्गे, पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर पाटील, भालचंद्र बोरकर, पोलिस कर्मचारी रमेश साबळे, चौधर, शिवतरे, सागर घोरपडे, हनुमंत बोराटे यांच्या पथकाने सापळा रचून टिपूला अटक केली. 
 

Web Title: Pune: Arrested for rape of minor girl and forced into prostitution