पुण्यातील कोंढवा भागात दहशतवादी विरोधी पथकाने बुधवारी रात्रीपासून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. संपूर्ण राज्यभरातील एटीएसचे अधिकारी कोंढव्यामध्ये पोहोचले असून दहशतवाद्यांशी संबंधित काही मोबाईलचे सिम कार्ड व लॅपटॉप ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या भागांत मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जवळपास ३५० पेक्षा जास्त पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये एटीएसचे अधिकाऱ्यांसह पुणे पोलिसांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.