

Leopard News Pune
Sakal
पुणे : औंध परिसरात २३ नोव्हेंबरला बिबट्याचा वावर आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने शोधमोहीम सुरू केली आहे. अधिकारी, कर्मचारी आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या पथकातर्फे थर्मल ड्रोन, ट्रॅप कॅमेरे, डॉग स्कॉड आणि पेट्रोलिंगच्या मदतीने बिबट्याचा शोध घेतला जात आहे. परिणामी, वन्यजीव हालचालीबाबत कोणतेही भाष्य करणे योग्य नसल्याने टेकडी परिसर आणि मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे असणाऱ्या भागातील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.