
रिक्षाचालकांचं CM शिंदेंना साकडं; विविध मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन
पुण्यात रिक्षा चालकांकडून आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातील रिक्षाचालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी केली आहे. आम आदमी पार्टी रिक्षा चालक संघटनेच्या वतीने आंदोलन कऱण्यात येत आहे.
हेही वाचा: CM शिंदे लवकरच पुणे दौऱ्यावर; दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करणार
आज पुण्यातील आरटीओ कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन झालं. रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. बेकायदेशीर टॅक्सी बंद कराव्यात ही प्रमुख मागणी या रिक्षाचालकांची होती. पुण्यातील रिक्षांची मीटर वाढ ही खटवा समितीच्या नियमाप्रमाणे व्हावी अशी देखील मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
हेही वाचा: MPSC च्या आंदोलक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरू नये म्हणून पुणे पोलिस अलर्ट मोडवर, बंदोबस्त तैनात
सीएनजीचे दर देखील रोज दोन पाच रुपयांनी वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा टॅक्स कमी केला तसाच सीएनजीचा सुद्धा टॅक्स कमी करावा अशी मागणीही या रिक्षाचालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
Web Title: Pune Auto Drivers Protest For Their Demands To Cm Eknath Shinde
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..