MPSC च्या आंदोलक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरू नये म्हणून पुणे पोलिस अलर्ट मोडवर, बंदोबस्त तैनात

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील नव्या बदलांसंबंधी काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्याने ते संतप्त झालेत
MPSC new syllabus do not protest from students
MPSC new syllabus do not protest from students
Updated on
Summary

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील नव्या बदलांसंबंधी काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्याने ते संतप्त झालेत

MPSC च्या धमकी वजा सूचनेच्या 'ट्वीट'ने आंदोलक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेतील नव्या बदलांसंबंधी काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. त्यामुळे सुरक्षेसाठी पोलिसांना हा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, पोलिसांनी विद्यार्थ्यांस विनंती केल्यानंतर विद्यार्थ्यांनीआंदोलन स्थगित केलं आहे. (MPSC new syllabus do not protest from students in pune)

आज सकाळी दहा वाजता पुण्यातील इंदुलाल कॉम्प्लेक्स येथे या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पुणे शहर पोलिसांनी आंदोलनाची परवानगी दिली नसल्याने आणि उमेदवारांनावर कोणताही गुन्हा दाखल होऊ नये यासाठी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांनी याची नोंद घेत त्या ठिकाणी जमा होऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे.

MPSC new syllabus do not protest from students
Eknath Shinde : चंद्रकांत पाटलांच्या सांत्वनासाठी CM शिंदे आज कोल्हापुरात, थेट दिल्लीवरून येणार

राज्यसेवा परीक्षेतील वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे. मात्र त्यासाठीचा अभ्यासक्रम हा अवाढव्य असल्याने त्याच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी द्यावा आणि २०२३ ऐवजी २०२५ पासून अभ्यासक्रम राबवावा अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतील यामुळे शास्त्री रस्त्यावर अहिल्या शिक्षक मंडळाजवळ मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांस विनंती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केलं असलं तरी राष्ट्रवादीकडून हे आंदोलन होणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुधारित परीक्षा योजनेच्या अनुशंगाने तयारीसाठी उमेदवारांना दीड वर्षाचा कालावधी उपलब्ध होईल असे नियोजन सुरू आहे. याशिवाय सदरचा अभ्यासक्रम हा २०२३ पासून लागू होणार आहे. त्यामुळे सध्या प्रक्रिया सुरु असलेल्या भरती प्रक्रियेशी काहीही संबंध नसणार आहे. २०२३ पासून हा निर्णय लागू करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे.

MPSC new syllabus do not protest from students
Shivsena V/S BJP : दिल्लीत शिंदेंऐवजी फडणवीस; नक्की मुख्यमंत्री कोण? ठाकरेंच्या सेनेचा सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com